Ad will apear here
Next
‘सेवांकुर’ राज्यस्तरीय प्रेरणा शिबिर उत्साहात
अहमदनगर : ‘सेवांकुर २०१७’ हे २१वे राज्यस्तरीय प्रेरणा शिबिर निंबळक येथील ‘स्नेहालय’मध्ये उत्साहात पार पडले.

११ ते १३ ऑगस्ट या कालावधीत झालेल्या या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. यात ‘मी कसा घडलो’ कार्यक्रमामध्ये निवडक यशस्वी व्यक्तींच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे मुलाखतीद्वारे मार्गदर्शन, आपली स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी काय करायला पाहिजे, याचा कृती आराखडा तयार करण्यासाठी महत्त्वाच्या विषयांसंदर्भात मार्गदर्शन सत्रे झाली. यामध्ये जीवनाचे ध्येय कसे ठरवावे, वेळेचे नियोजन, आत्मविश्वास कसा वाढवावा, सुसंवाद कौशल्ये आदींचा समावेश होता.

या शिबिराच्या यशस्वितेसाठी संतोष गरजे, महेश पवार, देवेंद्र गणबीर, नितीन बाबरे, निशा तीरवाडी. विकास सुतार यांनी परिश्रम घेतले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZJEBF
Similar Posts
नगरमध्ये ११ ऑगस्टपासून ‘सेवांकुर’ शिबिर स्वतःसाठी जगताना समाजासाठीही काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना समाजसेवेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. अविनाश सावजी व अन्य समविचारी मित्रांनी दहा वर्षांपूर्वी ‘सेवांकुर’ या खुल्या मंचाची सुरुवात केली. या वर्षीचे 'सेवांकुर' शिबिर अमरावतीमधील ‘प्रयास’ आणि अहमदनगरमधील ‘स्नेहालय’ या संस्थांनी आयोजित केले आहे
अंगणवाडी सेविकांसाठी मेळावा ताहाराबाद(अहमदनगर) : ‘जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून अंगणवाड्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सदस्या रेखा यशवंत पवार यांनी केले. ताहाराबाद
नगर जिल्ह्यातली पहिली ग्लोबल क्लासरूम सुरु शिर्डी/पुणे : ‘सातशे कोटी लोकसंख्या असलेल्या दुनियेत माणसाला माणसाकडून माणूस बनण्यासाठीच शिकायचे आहे. त्यासाठी जगभरातील माणसांचा एकमेकांशी सुसंवाद होणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन पुण्यातील संगणकतज्ञ संतोष तळघट्टी व्यक्त केले. शिर्डी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सुरू करण्यात आलेल्या ग्लोबल क्लासरूमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते
अण्णा हजारे यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अहमदनगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नुकतीच सदिच्छा भेट दिली. बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात, आमदार शिवाजीराव कर्डिले, समाजसेवक पोपटराव

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language